यंदा मुंबईच्या गणपतीचं आगमन मोठ्या जल्लोषात झालेल आहे. बाप्पाच्या आगमनाच्या गर्दी दरम्यान अनेक मंडळांनी काही नियम लागू केले होते. हे नियम सध्या चाललेल्या परिस्थितीला धरुन लागू करण्यात आले होत. याचपार्श्वभूमीवर आता अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी देखील गणेश मंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. यंदा अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश मंडळाकडून ठरावीक ड्रेस कोड ठरवण्यात आलेला आहे.
यावेळी भाविकांना अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी मंडळाकडून ठरवण्यात आलेल्या ड्रेस कोडमध्येच दर्शन घेण्यात येणार आहे. यावर्षी ज्या घटना घडत आहेत त्यापार्श्वभूमीवर भाविकांना हाफ पॅन्ट, शॉर्ट स्कर्ट घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येताना भाविकांनी गुडघ्यापर्यंत पूर्ण कपडे परिधान करून यावे असं मंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे.
हा नियम सर्वांनाच लागू होणार असून यामध्ये कलाकार सुद्धा असतील. भाविक दर्शनाला येताना स्लीवलेस कपडे घालून येतात यामुळे योग्य असं काही दर्शन होणार नाही याची खबरदारी भाविकांनी घ्यावी असं आवाहन देण्यात आलं आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाणार आहे.
तर जो कोणी भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येताना हाफ किंवा शॉर्ट कपडे परिधान करून येईल त्याला दर्शन दिले जाणार नाही. तर यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाणार नाही, तर हा नियम सर्वांसाठी समान असेल. त्याचसोबत यावर्षी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेताना राजस्थानचा राजेशाही थाट अनुभवायला मिळणार आहे. यावर्षी मंडळाने राजस्थानमधील पाटवा की हवेली अशी थीम साकारली आहे.